amitraj & bela shende - tola tola lyrics
Loading...
तोळा तोळा …
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो… 2
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो…
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो ।। ध्रु ।।
ती: तुझ्या नशील्या नजरेत मीही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
तो: हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो. ।। १ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
तो: तुझाच होतो जगणेही माझे मी विसरतो
करु नयेते सारे काही तुझ्यासाठी करतो
ती: ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो. ।। २ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.
Random Lyrics
- aoa - ok! lyrics
- jjx - friendly fire lyrics
- wiim - insomnia lyrics
- dumdum boys - store intet lyrics
- bello figo - salviamo i marò lyrics
- cast of galavant - a real-life happily ever after lyrics
- miguel bosé - lettere lyrics
- qusai - mother lyrics
- zona mc - la nascita del tragicomico hiphop dallo spirito degli speaker lyrics
- judy henske - bye bye blackbird lyrics