azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

asha bhosle – jeevani aadhar too (original) lyrics

Loading...

सोनफूल तू, रानवेल मी, सोड हा अविचार तू
आधार तू, जीवनी आधार तू!

कोठली मी? तू कुणाचा? योग आला दो जिवांचा
शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू!

चांदण्याचा हा फुलोरा, रोमरोमी ये शहारा
दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू

तू विसावा प्राणनाथा, प्रीतिचा सौभाग्यदाता
सोनियाच्या पाउलांनी दिपविला संसार तू