azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

milind ingle - gaarva (version 1) lyrics

Loading...

[intro: kishor kadam]
ऊन जरा जास्त आहे
दरवर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
पानाफुलांझाडावरती छपरावरती चढून पाहतो
दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार गार गातरवेल
चक्क डोळ्यांसमोर ऋतु कोस बदलून घेतो
पावसाआधी ढगामध्यें कुठून गारवा येतो

[chorus]
गारवा..
गारवा, वार्‍यावर भिर भिर भिर पारवा, नवा नवा
प्रिये.. नभात ही चांदवा नवा नवा
गारवा..

[verse 1]
गवतात गाणे झूलते कधीचे
गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये.. मनात ही
ताजवा नवा नवा
गारवा..

[verse 2]
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा, नवा नवा
प्रिये.. तुझा जसा गोडवा नवा नवा

[chorus]
गारवा..
गारवा, वार्‍यावर भिर भिर भिर पारवा, नवा नवा
प्रिये.. नभात ही चांदवा नवा नवा
गारवा..

[outro]
गारवा..



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...