![azlyrics.biz](https://azlyrics.biz/assets/logo.png)
revengerrap - najar aawar re lyrics
नजर आवर रे भडव्या तुझी ती टाकतोस कोणावर बघ
पुराणाची शोषित स्त्री कायद्याची झाली पेटती धग
छत्रपती शिवरायांची ती आहे शूरवीर लेक
विचाराच्या म्यानातून काढली आता तिने चमकती तळपती खग
सावित्रीच्या आधी होतं अडाणी सगळं स्त्री जग
अरे हिंदू कोड बिलातून दिला भिमानं समान हक्क
रोजच भेटतात फाटकेतुटके रोडीज मटके नग
अरे शापितानो सुड घेण्यासाठी रिव्हेंजर बनेल सगळ जग
मस्त आइटम आहे हॉट हॉट हॉट सेक्सी माल ऐकून ऐकून ती रे किती काढेल तग
आज उद्या या कपड्यांना सारे कॅमेरे लागतील बघ
जीव वाचवण्या पळता+पळता भुई तुला थोडी राहील बघ
आर दाखवायची तर दाखव अंगातली देशासाठी रग
नामर्दा तू कशाला अबलेला दाखवतो आपली धग
अरे चार दिवसाची नशा ठरवेल जगात तुला मोठा ठक
हतकड्याचे लोखंडाचे चणे खाशील तू
ये जा करणारे लोक करतील तुझ्यावर थू
आलिया भोगाशी असावे सादर
पण स्वतः शेखचिल्ली बनशील तू
कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही
लपून छपून केलेले काम काळे कधी झाकत नाही
जालसाजीचा धोकेबाजीचा उगीच खेळ तू मांडू नको
डाव खोटा नाटा रे नोटा खोट्यानाट्या खेळ असला भलता उलटून पालटून जाई
रोज माय बहिणीवर आरे शिवी देतो तू
मग दरसाली महिला दिवस साजरा करतो तू
घरी येऊन दारू पिऊन बायकोला मारतो तू
नावाला बायको उभी सरपंच म्हणवतो तू
फक्त स्वयंपाकाची सोय म्हणून बायको करतो तू
नजर आवर रे भडव्या तुझी ती टाकतोस कोणावर बघ
पुराणाची शोषित स्त्री कायद्याची झाली पेटती धग
छत्रपती शिवरायांची ती आहे शूरवीर लेक
विचाराच्या म्यानातून काढली आता तिने चमकती तळपती खग
सावित्रीच्या आधी होतं अडाणी सगळं स्त्री जग
अरे हिंदू कोड बिलातून दिला भिमानं समान हक्क
रोजच भेटतात फाटकेतुटके रोडीज मटके नग
अरे शापितानो सुड घेण्यासाठी रिव्हेंजर बनेल सगळे जग
मस्त आइटम आहे हॉट हॉट हॉट सेक्सी माल ऐकून ऐकून ती रे किती काढेल तग
आज उद्या या कपड्यांना सारे कॅमेरे लागतील बघ
जीव वाचवण्या पळता+पळता भुई तुला थोडी राहील बघ
आर दाखवायची तर दाखव अंगातली देशासाठी रग
नामर्दा तू कशाला अबलेला दाखवतो आपली धग
अरे चार दिवसाची नशा ठरवेल जगात तुला मोठा ठक
Random Lyrics
- dean cutsforth - quite the sight lyrics
- watson - all falls down lyrics
- lekba - personna freestyle lyrics
- fave christian - different lyrics
- prada - colapso - cover lyrics
- fisherman's friends - strike the bell lyrics
- peter maffay - morning song lyrics
- sean jane - runway lyrics
- the stupid stupid henchmen - corefix lyrics
- kemurii, rozzah - phonk sesh lyrics