azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

rishikesh kamerkar - aabhali ghan lyrics

Loading...

आभाळी घन दाटून आले
मन वेडे ओथंबले
मेघांच्या रंगात भिजुनी
क्षण झाले सावळे
रिमझिम रिमझिम झरताना
हळवी दुपार कलताना
तुझिया स्मृतिंच्या वेदना
विझता विझता जळताना
तुझ्यासवे भिजलो तू नसताना
भिजले हे मन पुनः
आभाळी घन दाटून आले
मन वेडे ओथंबले
मेघांच्या रंगात भिजुनी
क्षण झाले सावळे

स्मरणाच्या देशी पाउस आला
थेंबाचा सूरही कातर झाला
झाडांच्या ओठी थरथर ओली
वारा तुझिया शोधात निघाला
पडदा अलवार सरींचा
बाजूस सारुनी थोडा
ये ना ये ना आता तू येना
आभाळी घन दाटून आले
मन वेडे ओथंबले
मेघांच्या रंगात भिजुनी
क्षण झाले सावळे

क्षण आले सारे तो क्षण नाही
माझ्या भिजण्याचे कारण नाही
डोळ्यांची वेस कोरडी झाली
वादळ क्षमणार तुझ्यावीण नाही
क्षपथा घन गर्द धुक्यांच्या
तोडून टाकना साऱ्या
ये ना ये ना आता तू येना
आभाळी घन दाटून आले
मन वेडे ओथंबले
मेघांच्या रंगात भिजुनी
क्षण झाले सावळे



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...