
vaibhav santosh naik & siddharth landge - aai aahe lyrics
Loading...
मनात खूप काही पण कुणाला सांगत नाही
एकट्याने सोसते ती दुःख तरी मांडत नाही x2
जगी तिच्या भावनेला ममतेला मोल नाही
स्वामी तिन्ही या जगाचा आईविना पूर्ण नाही
आभाळापरी तिचे हे प्रेम कधी संपत नाही …..
अशी लाजरी साजरी एक माझी आई आहे
अशी लाजरी साजरी या जगात आई आहे x2
हसु तिच्या चेहऱ्यावरचे कळीपरी उमलत ऱ्हावे
आले जरी संकट वारे डोळी तिच्या पाणी ना यावे
हो……
हसु तिच्या चेहऱ्यावरचे कळीपरी उमलत ऱ्हावे
आले जरी संकट वारे डोळी तिच्या पाणी ना यावे
ठेच लागता पायाला येते आठवणं आईची
हो …हात फिरविता मायेचा देते ऊब ती ममतेची
असो मी कुठेही कसा ही जीव तिचा अडकून आहे ….
अशी लाजरी साजरी एक माझी आई आहे
अशी लाजरी साजरी या जगात आई आहे x2
Random Lyrics
- mlodykamil - kło po ty lyrics
- locked23 - напополам (in half) lyrics
- jillian dawn - a to z lyrics
- 0neo - brain damage lyrics
- michael khanh - nerves lyrics
- souq - slimey lyrics
- many eyes - the clock behind all other clocks lyrics
- jumal x10 lavis - kaasupää v lyrics
- pretty p (paula) - i heard lyrics
- prince ferg - lifetime lyrics